फक्त परिक्षा नाही तर संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा, आ.सतीश चव्हाण यांची मागणी

Foto

औरंगाबाद- राज्यात जवळपास सगळीकडेच दुष्काळग‘स्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षाच नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी आग्रही मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.३०विधान परिषदेत केली.

 

विरोधी पक्षाच्या वतीने परवा नियम २६० अन्वये दुष्काळावर सभागृहात चर्चा करण्यात आली होती. त्या चर्चेला आज महसूल मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी आ.सतीश चव्हाण म्हणाले कीदिवाळीच्या सुट्यानंतर नुकतेच महाविद्यालय सुरू झाले आहेत. मोठ मोठ्या शहरात शिकणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यांना महाविद्यालयात बसू दिल्या जात नाही. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसेच नसल्याचे सांगून या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कासह संपूर्ण शैक्षणिक शुल्क देखील माफ करावे अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

 

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीसंपूर्ण शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेवू शकतात. त्यामुळे यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय करेल. मात्र याचा निर्णय आत्ताच घ्यावा अशी मागणी करत विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहातच शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या. सभागृहात गदारोळ झाल्याने सभापतींनी दिवसभराचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.